नेटवर्क ला अडथळा आणल्याने अनेकांवर गुन्हा दाखल
मुंबई: विदर्भातील यवतमाळ, अकोला , अमरावती तसेच महाराष्ट्रातील बहुसंख्य भागातील प्रताप कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गेले काही दिवस चाललेला संप अखेर स्वतःहून मागे घेतला आहे . आपल्या अवास्तव आणि अवाजवी मागण्या मान्य करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून गणल्या गेलेल्या मोबाईल सेवेला नेटवर्क खंडित करून अडथळा आणला . अनेक ठिकाणी टॉवर आणि फायबर ची नासधूस करून जिओ कंपनी आणि असंख्य ग्राहकांना वेठीस धरले होते.
विदर्भात मोबाईल टॉवर आणि फायबर च्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी जिओने प्रताप टेक्नोक्रॅट या व्हेंडर ची नियुक्ती केली आहे . या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद करून आपल्या अवाजवी मागण्या मान्य करण्यासाठी जिओच्या नेटवर्क ला वेठीला धरले . ऐन परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांचा विचार न करता टॉवर बंद करून , फायबर ची नासधूस करून अत्यावश्यक सेवेला अडथळा आणला . कंपनीकडून याची गंभीर दखल घेऊन अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई करून पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली .
विशेष म्हणजे नेटवर्क सुरळीत करण्यासाठी रात्रदिवस मेहनत करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रताप च्या संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून धमकावण्यात आले . परंतु कंपनीने कर्मचाऱ्यांच्या मनमानीला न जुमानता अनेकांवर कडक कायदेशीर कारवाई केली .
प्रताप च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याचा दावा केला परंतु प्रतापकडून या दाव्याचे खंडन केले गेले . मोबाईल सेवेला नुकसान पोहोचविणे हा अक्षम्य अपराध मानला गेला आहे . असे असूनही मनमानीपणे आपल्या अवास्तव मागण्यांसाठी काही समाजकंटक कर्मचारी हकनाक सामान्य जनतेला त्रास देत असून अशा अप प्रवृत्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी सगळीकडून व्यक्त होत आहे.