भारताच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणारे शिवसेनेचे एक उदयोन्मुख युवा नेतृत्व म्हणजेच डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

0

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीसाठी अशा नेतृत्वाची गरज असते, जे परंपरा आणि प्रगती यांच्यात समतोल साधू शकते. *युवा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे* हे याच दृष्टीकोनातून एक प्रभावी युवा चेहरा म्हणून पुढे आले आहेत, जे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मूल्यांवर आधारित विकास आणि जनकल्याणाच्या दिशेने सातत्याने कार्यरत आहेत.

डॉ. श्रीकांत शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व सेवा, समर्पण आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. एमएस (ऑर्थो) अशी उच्च वैद्यकीय पदवी प्राप्त करून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि मानवसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. हाच सेवाभाव त्यांना राजकारणात घेऊन आला, जिथे त्यांनी सामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे ध्येय स्वीकारले.

शिवसेनेची विचारधारा, विशेषतः हिंदुत्वाचे तत्त्व आत्मसात करत डॉ. शिंदे यांनी विकासाला समावेशक दृष्टिकोनातून पुढे नेले आहे. त्यांच्या दृष्टीने हिंदुत्व ही केवळ सांस्कृतिक ओळख नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी एक भक्कम आधार आहे. या विचारातून त्यांनी सामाजिक समरसता, सांस्कृतिक अभिमान आणि आधुनिक विकास यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

सन २०१४ पासून संसदेत सक्रिय भूमिका बजावत त्यांनी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, शहरी विकास, वाहतूक व्यवस्था आणि युवकांच्या रोजगारासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर स्पष्ट आणि प्रभावी मते मांडली आहेत. त्यांच्या भाषणांमध्ये केवळ सखोलता नसून नीतिगत दिशा देण्याची ताकदही आहे. विशेषतः आरोग्य सेवांचे आधुनिकीकरण, ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा वाढवणे आणि परवडणाऱ्या उपचारांवर त्यांनी विशेष भर दिला आहे.

डॉ. शिंदे यांचा नीतिगत दृष्टिकोन लोककल्याणकारी, व्यावहारिक आणि दूरदर्शी आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पायाभूत सुविधांचा विकास आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला आहे. त्यांचे ध्येय स्पष्ट आहे—*विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे.*

आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी भारताची ठाम आणि सकारात्मक प्रतिमा मांडली आहे. “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत आखाती व आफ्रिकन राष्ट्रातील परदेशी उच्च पदस्थ समुदायाशी संवाद साधत त्यांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि विकसित होत असलेल्या भारताची ओळख प्रभावीपणे सादर केली. या उपक्रमातून त्यांनी प्रवासी भारतीयांना सुद्धा मातृभूमीशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे।

युवा नेतृत्व म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नव्या पिढीला दिशा देण्याचे काम केले आहे. कौशल्य विकास, स्टार्टअप्स, नवकल्पना आणि रोजगारनिर्मिती तसेच क्रिडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न युवकांना आत्मनिर्भरतेकडे नेण्यास प्रेरित करतात. त्यांच्या विचारांमध्ये आधुनिकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर समन्वय दिसून येतोय असे वाटणे स्वाभाविक होतेय.

डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे व्यक्तिमत्त्व त्यांच्या वडिलांसारखेच साधे, सहज आणि जनतेप्रती समर्पित आहे. ते लोकांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. त्यामुळेच ते एक जनमान्य आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

तरूण तडफदार, तीक्ष्ण तसेच परिपक्व राजकिय बुद्धिमत्तेचे “डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे” हे असे उदयोन्मुख युवा नेते आहेत, जे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मूल्यांवर आधारित विकास आणि जनकल्याणाच्या मार्गाने भारताला पुढे नेण्याची क्षमता ठेवतात. त्यांचे समर्पण, दृष्टिकोन आणि कार्यपद्धती वर्तमानातच नव्हे तर भविष्यातही राष्ट्रनिर्मितीत मोलाची भूमिका बजावतील यात कुणालाही व कसलीही शंका असण्याचे कारण वाटत नाही.

  • 🖊️• दिनेश शिंदे
  • राष्ट्रीय सह समन्वयक व
  • प्रसार माध्यम समन्वयक शिवसेना

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech