पंतप्रधान मोदींकडून पवन कल्याण यांच्या प्रकृतीची विचारपूस

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान म्हणाले की, पवन कल्याण खूप धाडसी आहेत आणि ते लवकरच बरे होतील असा विश्वास आहे. त्यांनी पवन कल्याण लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छाही व्यक्त केल्या. पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांनी पवन कल्याण यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे, दाक्षिणात्य अभिनेते आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची प्रकृती अचानक खालावल्यानंतर शनिवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. जनसेना पक्षाच्या माहितीनुसार, शुक्रवारी एका अधिकृत बैठकीदरम्यान त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी आणि एमआरआय स्कॅननंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech