बंगालचा ‘नवा दादा’ कोण? मुख्यमंत्रीपदाचे ३ प्रबळ दावेदार

0

कोलकाता | प्रतिनिधी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. तिथे भाजपने बहुमताचा १४८ हा आकडा पार करत ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने बंगालमध्ये ‘कमळ’ फुलवले असून, आता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या सुवेंदू अधिकारी, सामिक भट्टाचार्य आणि दिलीप घोष यांच्या नावांबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपच्या या ऐतिहासिक विजयानंतर दिल्लीपासून कोलकात्यापर्यंत हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा या तिन्ही नेत्यांपैकी कोणाची निवड करेल की एखादा ‘सरप्राईज’ चेहरा समोर येईल, याची उत्सुकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे धक्कातंत्र अवलंबतील, असाही कयास आहे. “नारीशक्ती”ला प्राधान्य दिले जाऊ शकते का, यावरही खल सुरू असल्याचे सूत्र सांगतात.

चर्चेत असलेले तीन प्रबळ दावेदार

१. सुवेंदू अधिकारी: ‘जायंट किलर’
ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे निकटवर्तीय आणि आताचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी सुवेंदू अधिकारी हे या शर्यतीत सर्वात पुढे मानले जात आहेत.
* बळ: विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी गेल्या ५ वर्षांत रस्ते गाजवले आहेत. नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही जागांवर त्यांनी दिलेली झुंज आणि पक्ष संघटनेवर असलेली त्यांची पकड ही त्यांची जमेची बाजू आहे.
* प्रभावी क्षेत्र: पूर्व मेदिनीपूर आणि दक्षिण बंगालमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे.

२. सामिक भट्टाचार्य: ‘संघटनात्मक चेहरा’
बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सामिक भट्टाचार्य यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे.
* बळ: संघाची पार्श्वभूमी आणि सुसंस्कृत चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. निवडणुकीच्या काळात विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे.
* जमेची बाजू: पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी त्यांचे असलेले सलोख्याचे संबंध त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत नेऊ शकतात.

३. दिलीप घोष: ‘कडवा संघटक’
भाजपला बंगालमध्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्यात माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा सिंहाचा वाटा आहे.
* बळ: कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले घोष हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. २०१९ आणि २०२१ च्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचा पाया त्यांनीच रचला होता.
* विशेष: ‘खड़गपूर सदर’मधून त्यांनी मिळवलेली आघाडी त्यांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध करत आहे.

मुख्यमंत्री निवडीत दिल्लीची भूमिका महत्त्वाची

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह लवकरच संसदीय मंडळाची बैठक घेऊन अंतिम नावावर शिक्कामोर्तब करतील. बंगालमध्ये ‘हिंदू ध्रुवीकरण’ आणि ‘महिला मतदारांचा कौल’ भाजपच्या बाजूने गेल्याने, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडताना सामाजिक समीकरणेही महत्त्वाची ठरतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech