फडणवीसांना अंधारात ठेऊन प्लॅन आखला, एकनाथ शिंदेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता? – मनोज जरांगे

0

जालना : मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपये आणि ऑडिओ क्लीपबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ऑडिओ क्लीप प्रकरणात एआयला पुढे करुन भाजपला पळवाट शोधता येणार नाही. या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा डाव होता का, अशी शंका येत आहे. या सगळ्या गोष्टी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवण्यात आले होते का, याचाही शोध घेतला पाहिजे. ऑडिओ क्लीपमध्ये बोलणाऱ्या लोकांच्या मागे देशातील कोणी बडा नेता असला पाहिजे. याचा शोध शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांनी घ्यावा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ते सोमवारी जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ऑडिओ क्लीप प्रकरणानंतर आता एकनाथ शिंदे गप्प बसणार नाहीत. हा त्यांच्यावर वैयक्तिक घाव आहे. त्यांचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता का? मला कालची माहिती आहे की, यात फडणवीस साहेबांना माहिती न होता त्यांनी हे केलेले आहे. फडणवीस साहेब खोलात गेले तर त्यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेम होता हे लक्षात येईल. क्लिपमध्ये बोलणारे लोक कोणाचे, ही कोणाची यंत्रणा आहे. यांच्या पाठीवर कोणाचा हात आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. ही बैठक आहे त्यामधून दिसून येते की, ते प्लॅनिंग करतात, नरेटिव्ह सेट करतात. यांच्या पाठीशी दिल्लीतून हात असला पाहिजे. भाजपपेक्षा मोठी संस्था यांच्या पाठिशी असावी. माझ्याविरोधात बोलणारे सगळ्यांना नोटा दिल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

दरम्यान या सगळ्याचा खोलात जाऊन शोध घेतला नाही तर या संपूर्ण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचाच हात होता, असा संदेश जाईल. माझ्याकडे कोणतंही यंत्र नाही, मी एआय व्हिडीओ कसा तयार करणार, तुम्ही कशालाही AI म्हणणार का? या सगळ्यात भाजपचे लोक होते. मात्र, ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती की नव्हती, हाच प्रश्न आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. मराठीमध्ये AI मध्ये करण्याइतके ते एवढे सक्षम नाही. आम्ही पण शोधात आहोत. मी गप्प बसणार नाही मी शोध घेणार. आता मी यांच्या मागे लागणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech