रामलीला मैदानावरील रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे खरगे यांचे आवाहन

0

नवी दिल्ली :  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी करत, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘व्होट बचाओ, देश बचाओ’ रॅलीत लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे.

खरगे यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ जारी करून सांगितले की, सणासुदीच्या काळात लोक महागाईमुळे त्रस्त आहेत. मात्र सरकारला त्याची चिंता नाही. कोट्यवधी भारतीयांच्या मतदानाच्या घटनात्मक अधिकाराला धोका निर्माण झाला आहे, असेही त्यांनी म्हटले. यासाठी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना जबाबदार धरले. खरगे म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि एसआयआर प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे. या मागण्यांसाठी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘व्होट बचाओ, देश बचाओ’ ही महारॅली आयोजित करण्यात येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech