५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप तपासासाठी एसआयटी स्थापन

0

– अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय एसआयटी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय एसआयटीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्रिस्तरीय एसआयटीची स्थापना केली आहे. या समितीची संपूर्ण जबाबदारी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष : शैलेश बलकवडे (अप्पर पोलीस आयुक्त), सदस्य : विजयकांत सागर (पोलीस उपायुक्त) आणि सदस्य : बजरंग बनसोडे (पोलीस उपायुक्त) यांचा समावेश आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये देण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता. या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करून त्यामागील सूत्रधारांचा चेहरा समोर आणावा, अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech