डीआरआयने १३.५ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ई-सिगारेट्स केल्या जप्त

0

नवी दिल्ली : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अवैध व्यापाराविरोधात आपली धडक कारवाई सुरू ठेवली असून, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरात तस्करी करून आणलेल्या ५५,००० हून अधिक ई-सिगारेट्स जप्त केल्या आहेत. डीआरआय अधिकाऱ्यांनी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, नेपाळला जाणारे दोन ट्रान्सशिपमेंट कंसाइनमेंट कंटेनर जप्त केले, ज्यामध्ये ई-सिगारेट्स असल्याचा संशय होता. एका कंटेनरमध्ये ई-सिगारेट्सना ‘पाण्याचा ग्लास’ आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये ‘सिरॅमिक मग’ म्हणून चुकीच्या पद्धतीने घोषित केले होते.

पहिल्या कंटेनरच्या सखोल तपासणीत, घोषित मालामध्ये लपवलेल्या ‘आयजीईटी’ (IGET) ब्रँडच्या विविध फ्लेवर्सच्या ४०,००० ई-सिगारेट्स जप्त करण्यात आल्या. तर, दुसऱ्या कंटेनरच्या सखोल तपासणीत, घोषित मालामध्ये लपवलेल्या ‘व्हीटीव्ही’ (VTV), ‘वोको’ (VOKO), ‘बँग’ (Bang) आणि ‘ईजॉय’ (Ejoy) यांसारख्या विविध ब्रँड्सच्या सुमारे १५,००० ई-सिगारेट्स जप्त करण्यात आल्या. सीमा शुल्क कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत, कवर कार्गोसह एकूण सुमारे ५५००० ई-सिगारेट्स जप्त करण्यात आल्या आहेत, ज्यांचे मूल्य १३.५० कोटी रुपये इतके आहे.

भारतात सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि लोकांना होणाऱ्या हानीपासून वाचवण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स प्रतिबंध (उत्पादन, निर्माण, आयात, निर्यात, परिवहन, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) कायदा २०१९ अंतर्गत ई-सिगारेट्स आणि सर्व प्रकारच्या ‘इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टम्स’ (ENDS) वर बंदी घालण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये, महसूल गुप्तचर संचालनालयाने महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील विविध बंदरे, विमानतळ आणि इनलँड कंटेनर डेपो (ICDs) येथे सुमारे ३,००,००० ई-सिगारेट्स जप्त केल्या आहेत, ज्यांचे मूल्य १२० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech