प्रत्येक सेगमेंटमध्ये वाढली इलेक्ट्रिक वाहनांची मागणी; खास ईव्हीसाठीच्या विम्याबाबत जागरूकतेवर विमा कंपन्यांचा भर
मुंबई : देशातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आज भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन मालकांना आपल्या मोटार इन्शुरन्सचे पुनरावलोकन करण्याचे आवाहन केले आहे. नुकताच समोर आलेला रजिस्ट्रेशन डेटा अलीकडील वर्षांतील ईव्ही बाजारपेठेतील सर्वात वेगवान वाढ दर्शवतो, हे लक्षात घेऊन कंपनीने ग्राहकांना उद्भवणाऱ्या नवीन धोक्यांबद्दल सतर्क केले आहे.
वाहन नोंदणीच्या आकडेवारीनुसार, भारतात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ दरम्यान २५.३७ लाख ईव्हीची नोंदणी झाली, जी मागील वर्षाच्या याच कालावधीतील १६.७० लाखांपेक्षा ५१.९% जास्त आहे. वर्ष २०२६ मधील या नऊ महिन्यांचा आकडा, २०२५ मधील संपूर्ण वर्षात नोंदणी झालेल्या २३,५६,९७१ ईव्ही पेक्षा अधिक झाला आहे. ईव्ही बाजारपेठेचा विकास दरही वेगाने वाढला आहे, जो २०२४ मध्ये २८.०% आणि २०२५ मध्ये १६.३% राहिल्यानंतर २०२६ मध्ये ५१.९% वर पोहोचला आहे.
या कालावधीत एकूण नवीन वाहन नोंदणीमध्ये ईव्हीचा वाटा १०.७% राहिला, जो मागील वर्षाच्या याच कालावधीत ८.६% होता. वर्ष २०२६ च्या प्रत्येक महिन्यात, २०२५ च्या त्याच महिन्याच्या तुलनेत वाढ नोंदवली गेली. सप्टेंबर महिना ३,३७,२४० ईव्ही नोंदणीसह आतापर्यंतचा सर्वात मजबूत महिना ठरला, ज्यामध्ये वार्षिक तत्त्वावर ७६.१% वाढ दिसून आली. सध्याच्या वेगानुसार, २०२६ मधील एकूण ईव्ही नोंदणी साधारणपणे ३३.८ लाखांपर्यंत पोहोचू शकते, तर सणासुदीच्या तिमाहीचे आकडे अजून येणे बाकी आहे.
ईव्ही घेण्याचे प्रमाण वाढण्यासोबतच, त्याशी संबंधित विमा गरजाही बदलत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरीचे नुकसान, विशिष्ट दुरुस्तीची गरज आणि चार्जिंगशी संबंधित घटना यांसारख्या वेगळ्या जोखमींचा समावेश असतो. वाहन मालकांसाठी हे समजून घेणे महत्त्वाचे बनत चालले आहे की त्यांच्या मोटार विमा पॉलिसी अंतर्गत हे धोके कशा प्रकारे कव्हर केले जात आहेत.
या ट्रेंडवर भाष्य करताना, टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मोटार अंडररायटिंग हेड, ए किरण कुमार म्हणाले, “भारताची ईव्ही गाथा आता सुरुवातीच्या टप्प्यातून बाहेर पडून मुख्य प्रवाहात आली आहे आणि हा बदल वाहन मालकांसाठी सुरक्षेचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो. इलेक्ट्रिक वाहनाचे रिस्क प्रोफाईल पारंपारिक वाहनापेक्षा वेगळे असते. बॅटरी हा त्याचा सर्वात मौल्यवान भाग आहे, दुरुस्तीसाठी अनेकदा विशिष्ट कौशल्याची विशेषज्ञता आवश्यकता असते आणि चार्जिंगमुळे घर आणि रस्ता दोन्ही ठिकाणी नवीन जोखीम निर्माण होते.”
टाटा एआयजी जनरल इन्शुरन्सने ग्राहकांच्या इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढणाऱ्या कलानुसार मोटार विम्यासंदर्भात जागरूक निर्णय घेण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. ईव्ही मालकांनी त्यांच्या पॉलिसीच्या व्याप्तीचे मूल्यांकन केले पाहिजे, ज्यामध्ये बॅटरीशी संबंधित नुकसान, कव्हर केलेल्या ठिकाणी चार्जिंग उपकरणे, अपघातामुळे होणाऱ्या नुकसानासाठी लागू असलेले कव्हरेज आणि इलेक्ट्रिक सर्ज सिक्योर कव्हर, बॅटरी कन्वीनियन्स कव्हर, वॉल चार्जर प्रोटेक्शन कव्हर यांसारख्या प्रासंगिक ॲड-ऑन संरक्षणाचा समावेश आहे. त्यांचे कव्हरेज त्यांच्या गरजेनुरूप आहे याची खात्री करण्यासाठी त्यांनी पॉलिसीचे अपवाद, डिडक्टिबल्स आणि क्लेमच्या अटी देखील समजून घेतल्या पाहिजेत.
इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर आणि इतर कमर्शियल ईव्हीचा वाढता वापर पाहता वाहनांच्या संपूर्ण फ्लीटची सुरक्षा महत्त्वाची बनली आहे. व्यापारी कंपन्यांसाठी विम्याचा अर्थ फक्त वाहनाच्या नुकसानीपुरता मर्यादित नाही. यात काम थांबणे, व्यवसाय सातत्याने सुरू राहणे आणि पॉलिसीच्या अटींवर अवलंबून राहून संपूर्ण फ्लीटच्या जोखमींचे व्यवस्थापन करणे देखील समाविष्ट आहे.
जसजशी भारताची ईव्ही बाजारपेठ वाढते आहे, तसतसे वाहनांसाठी आवश्यक असलेल्या विशेष विमा गरजांबद्दल अधिक जागरूकता ग्राहक आणि कंपन्यांना सुरक्षेशी संबंधित योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकते. विमा उद्योगासाठी ही एक मोठी संधी आहे की त्यांनी जोखमीची जाणीव आणि योग्य कव्हरेज एकत्र आणून भारताच्या बदलत्या मोबिलिटीच्या पुढील टप्प्याला मजबूत पाठबळ द्यावे.