• एक कोटीचा टप्पा गाठणारा सर्वात तरुण ऑटोमोटिव्ह ब्रँड
• भारतातील सर्वाधिक पुरस्कारप्राप्त स्कूटर, जी नवीन भारताची निवडही आहे
मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनी (TVS Motor Company) – टीव्हीएस विनू समूहाचा (TVS Group) भाग असून दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या निर्मिती क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीच्या कंपनीने तामिळनाडूतील होसूर येथील आपल्या उत्पादन प्रकल्पातून ‘टीव्हीएस ज्युपिटर’ (TVS Jupiter) च्या एक कोटीव्या युनिटचे उत्पादन पूर्ण झाल्याची घोषणा आज केली. या टप्प्यामुळे, टीव्हीएस ज्युपिटर हा भारतातील सर्वात वेगाने आणि सर्वात कमी कालावधीत एक कोटी युनिट्सचे उत्पादन करणारा स्कूटर ब्रँड ठरला आहे. या कामगिरीने देशातील सर्वात प्रतिष्ठित मोबिलिटी ब्रँड्सपैकी एक म्हणून त्याचे स्थान अधिक भक्कम केले आहे.
गेल्या 13 वर्षांहून अधिक काळ, टीव्हीएस ज्युपिटर (TVS Jupiter) भारतासोबत विकसित होत गेली आहे आणि देशातील अनेक कुटुंबांच्या दैनंदिन प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. 2013 मध्ये ‘ज्यादा का फायदा’ (Zyada Ka Fayda) या तत्त्वज्ञानासह सादर करण्यात आलेल्या या ब्रँडने, ग्राहकांना जास्त काहीतरी देऊन दैनंदिन प्रवासाची व्याख्या नव्याने मांडण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
आजही, टीव्हीएस ज्युपिटर उत्तम कामगिरी, अधिक मायलेज, अधिक आराम आणि ग्राहकांची सोय पाहते आहे. भारताचा वाढता आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा आणि बदलत्या गरजांनुसार, ‘ज्यादा’ (Zyada) देण्याचे आपले वचन अधिक व्यापक करत, टीव्हीएस ज्युपिटर सातत्याने प्रगती करत आहे.
या टप्प्याबद्दल, टीव्हीएस मोटर कंपनीच्या ‘पीपल मोबिलिटी, इंडिया टू-व्हीलर बिझनेस’चे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध हलदार म्हणाले, “गेल्या दशकात भारताच्या सामूहिक जाणीवेमध्ये बदल झाला आहे. कमतरतेच्या मानसिकतेतून आपण आत्मविश्वास, विकास आणि समृद्धीच्या मानसिकतेकडे वाटचाल केली आहे, जिथे ग्राहक अधिकाधिक आकांक्षा बाळगत आहेत. ‘ज्यादा’ (Zyada) या तत्त्वज्ञानावर आधारित ‘टीव्हीएस ज्युपिटर’ (TVS Jupiter) हे बदलत्या भारताचे आणि त्याच्या वाढत्या आकांक्षांचे प्रतीक बनले आहे. ‘टीव्हीएस ज्युपिटर’ हा एक कोटी भारतीयांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रमुख भाग असून, त्याने त्यांच्या आयुष्यात आनंद आणला आहे. हे यश म्हणजे ‘टीव्हीएस ज्युपिटर’ने कमावलेला विश्वास आणि ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला भरवसा आहे. तसेच, हे यश आमच्या कर्मचारी, डीलर भागीदार आणि पुरवठादारांच्या कठोर परिश्रमांचे, तसेच आमच्या अभियांत्रिकी, उत्पादन आणि वितरण क्षमतांच्या बळाचे प्रतीक आहे. मला खात्री आहे की, भारत जसा प्रगती करत नवीन शिखरे गाठत आहे, तसे भविष्यातही अनेक महत्त्वाचे टप्पे आपण गाठू.”
आपल्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात टीव्हीएस ज्युपिटर प्रवेश करत असताना, भारताच्या बदलत्या आकांक्षांनुसार विकसित होण्यावर आणि दैनंदिन प्रवास अधिक सुखद तसेच फायदेशीर बनवण्यावर त्याचे लक्ष केंद्रित आहे. ‘ज्यादा’ (Zyada) ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून, टीव्हीएस ज्युपिटर भारताच्या बदलत्या गरजांनुसार सतत विकसित होत राहील; दैनंदिन प्रवासात अधिक मूल्य निर्माण करेल आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक विश्वासार्ह साथीदार म्हणून कायम राहील.