इंडी आघाडीचे निवडणूक आयोगाच्या एसआयआर आणि इतर मुद्द्यांवर सरन्यायमूर्तींना पत्र

0

नवी दिल्ली : विरोधी पक्ष इंडी आघाडीतील २३ घटक पक्ष आणि एका अपक्ष सदस्याने निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयर) प्रक्रियेसंदर्भात आणि इतर निवडणूक-संबंधित मुद्द्यांबाबत भारताचे सरन्यायाधीश, न्यायमूर्ती सूर्यकांत यांना एक संयुक्त पत्र पाठवले आहे. काँग्रस नेते जयराम रमेश यांनी मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, ८ जून रोजी झालेल्या ‘इंडिया जनबंधन’च्या बैठकीत २१ राजकीय पक्ष आणि एका अपक्ष सदस्याने भाग घेतला होता.

या बैठकीत निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेसंदर्भात आणि निवडणूक पारदर्शकतेशी संबंधित मुद्द्यांबाबत भारताच्या सरन्यायाधीशांना एक संयुक्त पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. २३ पक्ष आणि एका अपक्ष सदस्याने स्वाक्षरी केलेले हे पत्र आता सरन्यायाधीशांना पाठवण्यात आले आहे. रमेश यांनी सांगितले की, विरोधी पक्ष एकजूट, ऐक्य आणि प्रतिकारासाठी ठामपणे कटिबद्ध आहेत. लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आणि निवडणूक पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांचा हा एक संयुक्त उपक्रम आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech