टोरेंट प्रकल्पातील वृक्षतोडीच्या आरोपांवरून राज ठाकरेंची भीमाशंकर परिसरात पाहणी

0

रायगड : टोरेंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी सह्याद्रीच्या साई डोंगरभागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भीमाशंकर परिसरात भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणामुळे पर्यावरण संवर्धन आणि प्रस्तावित प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भीमाशंकर परिसर पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. टोरेंट पॉवरच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी मोठ्या संख्येने झाडे तोडली जात असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. या वृक्षतोडीमुळे वनसंपदा, वन्यजीवांचे अधिवास आणि स्थानिक जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष परिसरात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. स्वतः रुक्ष रोपण केले व वृक्षतोडीच्या आरोपांमुळे स्थानिक पातळीवर चिंता व्यक्त होत असताना त्यांच्या दौऱ्यामुळे या विषयाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारे संभाव्य परिणाम, वृक्षतोडीची व्याप्ती आणि त्यासंदर्भातील परवानग्या याबाबत संबंधित यंत्रणांकडून स्पष्टता येणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरे यांच्या पाहणीनंतर शासन आणि वनविभाग याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech