नीट यूजी २०२६ पेपरफुट : शेषराव सूर्यवंशीच्याविरोधात आरोपपत्र दाखल

0

नवी दिल्ली : नीट यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आरोपी शेषराव बजरंग सूर्यवंशी यांच्याविरोधात दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले सूर्यवंशी हे १४ वे आरोपी ठरले आहेत. यापूर्वी सीबीआयने अन्य १३ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष सीबीआय न्यायालयात होणार आहे. न्यायालयाने आरोपी शेषराव सूर्यवंशी यांना आरोपपत्राची प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

सीबीआयच्या दाव्यानुसार, सूर्यवंशी यांनी कथितरीत्या नीट परीक्षेतील प्रश्न उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे घेतले होते. उमेदवारांना महाराष्ट्रातील नांदेड येथील एका घरात नेऊन त्यांना परीक्षेतील कथित फुटलेले प्रश्न देण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.तसेच, पैसे मिळण्याची खात्री करण्यासाठी सूर्यवंशी यांनी उमेदवारांची मूळ कागदपत्रे आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे स्वतःकडे ठेवल्याचा आरोपही सीबीआयने केला आहे. या संपूर्ण प्रकारात सूर्यवंशी आणि शुभम खैरनार यांच्यात कथित संगनमत असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.

यापूर्वी १३ जणांच्या विरोधात आरोपपत्र
सीबीआयने या प्रकरणात यापूर्वी मनीषा मंधारे, मनीषा संजय हवालदार, मनीषा वाघमारे, प्रल्हाद कुलकर्णी, शिवराज रघुनाथ मोटेगांवकर, डॉ. मनोज शिरुरे, तेजस हर्षद शाह, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, यश यादव, मंगलिलाल बिवाल, दिनेश बिवाल आणि विकास बिवाल या १३ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आता शेषराव बजरंग सूर्यवंशी यांच्याविरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आगामी २२ ऑक्टोबरला पुढील सुनावणीया प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रावर आणि संबंधित कागदपत्रांवर न्यायालयात पुढील सुनावणीदरम्यान विचार होण्याची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech