चीन स्मॅशच्या उपांत्य फेरीत मानुष शाह आणि मानव ठक्कर यांचा पराभूत

0

बीजिंग : भारताच्या मानुष शाह आणि मानव ठक्कर यांना शुक्रवारी विश्व टेबल टेनिस स्मॅश स्पर्धा २०२६ च्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण कोरियाच्या लिम जोंगहून आणि ओह जुनसुंग यांनी भारतीय जोडीचा सरळ गेममध्ये ३-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. शौगांग पार्क येथे झालेल्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या जोडीने ११-८, ११-६ आणि ११-३ असा विजय मिळवला. हा सामना २० मिनिटांपेक्षाही कमी वेळ चालला.

भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये चांगली लढत दिली. मानुष आणि मानव यांनी स्वतःच्या सर्व्हिसवर तसेच प्रतिस्पर्ध्याच्या सर्व्हिसवर प्रत्येकी चार-चार गुण मिळवले. मात्र, त्यानंतर दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी सामन्यावर आपली पकड मजबूत केली. दुसऱ्या गेममध्येही भारतीय जोडीला पुनरागमन करता आले नाही. तिसऱ्या गेममध्ये दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत ९-१ अशी मोठी आघाडी घेतली. त्यानंतर ११-३ असा गेम जिंकून त्यांनी सामना आपल्या नावावर केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech