शेतकरी कुटुंबासोबत एकनाथ शिंदेंची दिवाळी; झोपडीत बसून केलं जेवण!

0

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटलं की फटाके, मिठाई आणि घरातला आनंद. पण यंदा जालन्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्याच्या झोपडीत पोहोचले. मौजपुरी गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबासोबत जमिनीवर बसून, त्यांच्याच ताटात त्यांनी दिवाळीचे जेवण केले. शिंदेंच्या या साधेपणाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्ह्यातील मौजपुरी गावात दाखल झाले. दुष्काळामुळे पिके हातची गेलेली शेतकरी कुटुंबे, त्यांची व्यथा त्यांनी प्रत्यक्ष ऐकून घेतली. यानंतर त्यांनी एका शेतकऱ्याच्या झोपडीत जाऊन दिवाळीचा फराळ आणि जेवण केले. खाली सतरंजीवर बसून, साधं वरण-भात, भाजी-पोळी आणि दिवाळीचे लाडू-चिवडा याचा त्यांनी आस्वाद घेतला. कोणताही बडेजाव न करता, कुटुंबातील लहान मुलांशी, महिलांशी गप्पा मारत त्यांनी तब्बल काही वेळ तिथेच घालवला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech