क्षयरोग कायमचा संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित निर्धाराने काम करावे – राष्ट्रपती

0

नवी दिल्ली : दरवर्षी २४ मार्च रोजी पाळल्या जाणाऱ्या ‘जागतिक क्षयरोग दिना’च्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, मला हे जाणून आनंद होत आहे की, क्षयरोगामुळे (टीबी) निर्माण झालेल्या जागतिक आव्हानाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने २४ मार्च रोजी ‘जागतिक क्षयरोग दिन’ पाळला जातो. मी सर्व संबंधितांना आवाहन करते की, क्षयरोग कायमचा संपुष्टात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित निर्धाराने हातात हात घालून काम करावे.”

क्षयरोग हे आजही सार्वजनिक आरोग्यापुढील एक गंभीर आव्हान आहे, ज्यामुळे जगभरातील लक्षावधी लोकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. तथापि, ‘टीबी मुक्त भारत अभियाना’ने रोगाचे लवकर निदान करणे, मोफत उपचार सुनिश्चित करणे, पोषणविषयक सहाय्य बळकट करणे आणि रुग्णांच्या सेवेत सुधारणा घडवून आणणे या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. ही प्रगती आपला सामूहिक निर्धार आणि ‘राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमा’ची ताकद अधोरेखित करते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech