“भारत अस्तित्वात असेपर्यंत जग सुरक्षित” – सरसंघचालक

0

नागपूर : जोपर्यंत भारताचे अस्तित्व टिकून आहे, तोपर्यंत संपूर्ण जग सुरक्षित राहील असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी केले. ते नागपुरात आयोजित आयोजित पंचकल्याणक प्रतिष्ठा गजरथ महोत्सवादरम्यान संतांच्या सभेला संबोधित करताना बोलत होते. याप्रसंगी सरसंघचालकांनी भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक श्रेष्ठतेवर भर देताना सांगितले की भारत “विश्वाची आत्मा” आहे आणि त्याचे अस्तित्व जागतिक संतुलनासाठी अत्यावश्यक आहे. जगभरात भौतिकवाद आणि उपभोक्तावादाचा वाढता प्रभाव अनेक समाजांना कमजोर करत आहे, परंतु भारत या आव्हानांमध्येही स्थिर आहे. त्यांच्या मते, भारताकडे असे आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धिमत्ता आहे, जे इतर देशांमध्ये दुर्मिळ आहे.

जगातील ग्रीस, इजिप्त आणि रोम यांसारख्या प्राचीन संस्कृती काळानुसार नष्ट झाल्या, मात्र भारताची संस्कृती आजही जिवंत आणि सक्षम आहे. या सातत्याचे श्रेय त्यांनी देशातील संत, महापुरुष आणि पूर्वजांकडून मिळालेल्या ज्ञानाला दिले. आपल्या अस्तित्वाचे रहस्य ते ज्ञान आहे जे आपल्याला आपल्या संतांकडून मिळाले आहे. जेव्हा-जेव्हा जग एखाद्या संकटाचा सामना करते, तेव्हा भारतच पुढील मार्ग दाखवतो असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी संतांच्या भूमिकेचे कौतुक करताना सांगितले की संतांच्या माध्यमातून प्रसारित होणारे आध्यात्मिक ज्ञान हीच भारताची खरी ताकद आहे, जी देशाला बाह्य प्रभावांपासून सुरक्षित ठेवते असे भागवत यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech