जळगाव : सणासुदीच्या तोंडावर आणि महिन्याच्या सुरुवातीला मागील दोन दिवसांत सोने-चांदीच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, सराफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल १७५० रुपयाची वाढ झालीय. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १६०० रुपयांनी तर १८ कॅरेट सोन्याचा दर १३१० रुपये प्रति तोळ्याने वाढला आहे. सोन्यासोबतच चांदी दरातही मोठी वाढ झाली. आज चांदीचा एक किलोचा दर ५००० रुपयांनी वाढला. या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. एक किलो चांदीच्या दरात ५,००० रुपयांची वाढ झाली असून, १ किलो चांदीचा भाव २,४०,००० रुपये इतका आहे. सणासुदीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ ग्राहकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता असल्याने खरेदीपूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासूनच व्यवहार करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.