कर्करोगविरोधी १,३६४ औषधांच्या सुधारित एमआरपी लागू

0

ग्राहकांची वर्षाला ३,५४०.३८८ कोटी रुपयांची होणार बचत

नवी दिल्ली : रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागांतर्गत असलेल्या राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) कर्करोगविरोधी १३७ औषधांच्या एमआरपीवरील (कमाल किरकोळ दर) व्यापारी लाभांशाची मर्यादा निश्चित केली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्यसेवा महासंचालनालयाने १७ ऑक्टोबर, २०२६ रोजी स्थापित केलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीच्या आधारे हे पाऊल उचलण्यात आले आहे. या औषधांच्या सुधारित एमआरपी आज ९ नोव्हेंबर, २०२६ पासून लागू होत आहेत.

दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत, ८५ औषधनिर्मिती कंपन्यांनी १२१ औषधांशी संबंधित १,३६४ कर्करोगविरोधी औषध फॉर्म्युलेशन्सच्या एमआरपी जाहीर केल्या आहेत. यापैकी ६७९ ब्रँड्सनी किमतीत ५० टक्क्यांहून अधिक कपात नोंदवली आहे. एमआरपीमध्ये सर्वाधिक कपात ९६.४५ टक्के नोंदवण्यात आली आहे. किमतींमधील या कपातीमुळे ग्राहकांची वर्षाला अंदाजे ३,५४०.३८ कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे.

औषधांच्या आवेष्टनावर छापलेली सुधारित एमआरपी ग्राहक तपासू शकतात. फार्मा सही दाम (Pharma Sahi Daam) या मोबाईल ऍपच्या किंवा एनपीपीए संकेतस्थळाच्या (nppa.gov.in) माध्यमातून ग्राहक औषधांच्या किमती पडताळू शकतात. कुठलाही केमिस्ट किंवा हॉस्पिटल फार्मसी सुधारित एमआरपीपेक्षा अधिक पैसे घेऊ शकत नाही. त्यांनी अधिक किंमत आकारणी केल्यास किंवा किमतीशी संबंधित इतर कोणतीही तक्रार असेल, तर ग्राहक फार्मा जन समाधान'( Pharma Jan Samadhan portal ) पोर्टलद्वारे आपली तक्रार नोंदवू शकतात किंवा एनपीपीएच्या हेल्पलाइन क्रमांक 1800-111-255 वर संपर्क साधू शकतात.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech