नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची माहिती आता एका क्लिकवर!

0

कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकृत संकेतस्थळ भाविकांसाठी सुरू पर्वणी स्नानाच्या तारखा, प्रवास, निवास आणि सुविधांची माहिती मिळणार एकाच ठिकाणी

नाशिक : सिंहस्थ कुंभपर्व २०२७ च्या तयारीला ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याने औपचारिक प्रारंभ झाल्यानंतर आता भाविकांच्या सोयीसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून कुंभमेळ्याशी संबंधित महत्त्वाची माहिती भाविकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणारे भाविक, विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, धार्मिक संस्था, पर्यटन व वाहतूक क्षेत्रातील घटक तसेच प्रसारमाध्यमांसाठी हे संकेतस्थळ महत्त्वाचे माहिती व्यासपीठ ठरणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ : https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in

कुंभमेळ्याशी संबंधित माहिती विविध माध्यमांतून शोधण्याऐवजी ती एकाच अधिकृत व्यासपीठावर उपलब्ध करून देणे, हा संकेतस्थळ सुरू करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. पर्वणी स्नानाच्या तारखा व वेळा, महत्त्वाच्या घोषणा, धार्मिक स्थळांची माहिती, प्रवासाचे नियोजन, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षाविषयक सूचनांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. संकेतस्थळाच्या सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित केल्या जाणार असून, आगामी काळात अधिक माहिती आणि डिजिटल सेवांची भर पडणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech