मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

0

मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये दोन सुरक्षारक्षक जखमी झाल्याचे सांगण्यात येते तर तीन तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या असल्याची माहिती आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर मंत्री संजय शिरसाठ यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे. पोलीस आयुक्तांना फोन केला असता त्यांचा फोन बंद होता, असं संजय सिरसाट म्हणाले. दरम्यान, याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलिसांकडून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

3 युवक बंगल्यासमोर आले. पिलेल्या अवस्थेत ते होते, असं एकंदरीत ते दिसतंय. बाटल्या फोडल्या, आणि अनेक गोष्टी माझ्या खिशात असल्याचे सांगत घराकडे येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या संदर्भात पोलीस आयुक्तांना फोन केला असता त्यांचा फोन बंद होता, असं संजय सिरसाट म्हणाले. एका पालकमंत्र्याच्या घरावर हल्ला होतो, किमान त्याची दखल तर घ्या, असं म्हणत संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिऊन घरासमोर गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकल्याचा राग मनात धरून तिघांनी शिरसाट यांच्या घराच्या दिशेने बाटल्या फेकल्याचा आरोप आहे. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, घटनेनंतर पोलिसांना फोन केला, मात्र पोलिसांचा फोन बंद होता, असा गंभीर आरोप करत संजय शिरसाट यांनी पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech